भाजप-डाव्यांचा बंगालमध्ये दंगली भडकाविण्याचा प्रयत्न   

कोलकाता : मालदा येथील हिंसाचारावर भाजप आणि डावे एकमेकांशी राजकारण करत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ईदनिमित्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सोमवारी कोलकाता येथील ईदगाह येथे पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.नाव न घेता ममता म्हणाल्या, की हे दोन्ही पक्ष मिळून दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ईद आहे आणि दुसरीकडे नवरात्रही सुरू आहे, या दोन्ही सणांसाठी खूप शुभेच्छा देते. कोणीही अशांतता निर्माण करू नये.दंगल रोखण्यासाठी टीएमसी सरकार कटिबद्ध आहे. आम्ही सर्व धर्मांसाठी प्राणाची आहुती देण्यास तयार आहोत. बहुसंख्याकांचे कर्तव्य अल्पसंख्याकांचे रक्षण करणे आणि बहुसंख्याकांसोबत राहणे हे अल्पसंख्याकांचे कर्तव्य आहे. आम्ही कोणालाही दंगल घडवू देणार नाही, असे ममता म्हणाल्या. 

Related Articles